सवतकडा पर्यटकांच्या प्रतीक्षेत

| आगरदांडा | प्रतिनिधी |

वर्षा पर्यटनात महत्त्वाचा दुवा ठरणारा सवतकडा येथील मुख्य धबधबा अखेर ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे याठिकाणी पर्यटकांचा ओघ वाढणार आहे.
सवतकडा धबधबा हा मुरुड तालुक्यातील वावडुंगी ग्रामपंचायत हद्दीतील सायगाव या गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहे. घनदाट वृक्षराजीतून या रस्त्यावरुन या धबधब्यावर जाता येते. एका बाजूला उंचच्या उंच कडा, त्यातून फेसाळत खाली येणारे दुधाळ धबधबे, तर दुसऱ्या बाजूला धुक्याचे अच्छादन इथला निसर्ग न्याहाळताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही. निसर्गाची ही जादुई दुनिया पाहण्यासाठी सवतकडा धबधब्यावर पर्यटकांची गर्दी होत असते.

Exit mobile version