सावंतांमुळे शिंदेंची डोकेदुखी वाढली

धनुष्यबाण हटवला, बंडाचा इशारा

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. तानाजी सावंत यांनी आजाराचे कारण देत तडकाफडकी पुण्याला निघून गेले. त्यातच आता तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा दिला आहे.

तानाजी शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वी त्यांचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. तसेच त्यांनी कव्हर इमेजही बदलली आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. विशेष म्हणजे, धनुष्यबाण हटवत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. त्यावर शिवसैनिक असे नमूद केले आहे.

तानाजी सावंत हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यातच त्यांनी हा बदल केल्याने ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तानाजी सावंत हे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी झालेले नाहीत. तानाजी सावंत यांच्या नाराजीनाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.

Exit mobile version