सावंतवाडी दुहेरी हत्याकांड प्रकरण

विषप्राशन करणारा संशयित युवक पुन्हा बेपत्ता
। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
सावंतवाडी उभा बाजार परिसरातील दोन वृद्ध महिलांच्या हत्येच्या प्रकरणानंतर पोलिसांच्या चौकशीच्या भीतीने विषप्राशन केलेला युवक पुन्हा एकदा बेपत्ता झाला आहे. याबाबतची खबर त्याच्या कुटुंबीयांनी सावंतवाडीत पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा दिली आहे. त्याबाबत पोलीस तपास करीत असून, त्याचे मोबाईल लोकेशन पारपोली परिसरात मिळाल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त झाली आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सावंतवाडी पोलिसांचे पथक पारपोली परिसरात शोधासाठी रवाना झाले असल्याचेही समजते.
सावंतवाडी उभा बाजार परिसरात दोन वृद्ध महिलांच्या हत्याकांडाच्या प्रकरणानंतर त्यांच्या शेजारी राहणारे काही युवक मृत शालिनी खानविलकर यांच्या घरात घटना पाहण्यासाठी गेले होते. यातील काही जणांकडे पोलिसांनी चौकशी केली होती. याच चौकशीच्या भितीने त्यातील एका युवकाने विष प्राशन केले होते. त्यानंतर त्याला वेंगुर्ले येथून सावंतवाडी आणून त्याला उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराअंती त्याला कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले होते.

Exit mobile version