रक्षाबंधनासाठी सावर्डे बाजारपेठ सजली

। सावर्डे । वृत्तसंस्था।

रक्षाबंधन दहा दिवसावर आल्यामुळे सावर्डे बाजारपेठेत राखी विक्रीचे स्टॉल मांडण्यात आले आहेत. महिला परगावी असणार्‍या भावांना पोस्टाने राखी पाठवण्यासाठी राखी खरेदीसाठी स्टॉलसमोर गर्दी करू लागल्या आहेत. रक्षाबंधन सणाअगोदर दोन दिवस राखी खरेदीसाठी बाजारात गर्दी होईल, असे स्टॉलचालक सचिन नरोटे यांनी सांगितले. बाजारात डायमंड डिजायनर, मुंबई दोरी, चंदन व रूद्राक्ष, सरदोसी, रेशम वुलन गोंडा, लहान मुलांसाठी म्युझिक लाईट अशा विविध रंगाच्या व नक्षीकाम केलेल्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यांची किंमत अगदी पाच रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत आहे. यंदा राखीच्या किंमतीत अगदी अल्प वाढ झाल्याचे येथील दुकानदारांनी सांगितले.

Exit mobile version