‘स्वदेस फाउंडेशनतर्फे शिष्यवृत्तीची योजना’

| म्हसळा | वार्ताहर |

रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला यांच्या स्वदेस फाउंडेशनच्यावतीने रायगड जिल्ह्यामधील माणगाव, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर व सुधागड या तालुक्यामध्ये ग्रामीण सक्षमीकरणाचे प्रकल्प गाव विकास समितीच्या सहकार्यांमधून राबवित आहेत. स्वदेस शिष्यवृत्ती योजना हा या उपक्रमाचाच एक भाग आहे. गेल्या अनेक शैक्षणिक वर्षांमध्ये स्वदेस फाउंडेशनच्या मदतीने 554 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देऊन त्यांची उच्च शिक्षणाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. स्वदेस फाऊंडेशनतर्फे आवाहन करण्यात येते कि जे गरीब आणि होतकरू विद्यार्थी आहेत त्यांनी या शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी महाड- आर्यन मेहता- 9113110326, पोलादपूर- साईप्रतीक पानिग्रही- 8327713296, म्हसळा/श्रीवर्धन- राकेश पवार- 8668637713, तळा/सुधागड- शबनम बुशरा- 8439411452 माणगाव- दीप्ती खैरे- 9145923401 तालुका प्रतिनिधी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केला आहे.

Exit mobile version