| उरण | प्रतिनिधी |
स्कॉलरशिप परीक्षेच्या उज्ज्वल निकालाची परंपरा असलेल्या साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राथमिक आणि माध्यमिक विद्यालयात इयत्ता चौथी आणि इयत्ता सातवीच्या स्कॉलरशिप अभ्यास वर्गाचे उद्घाटन साई मंगळवारी (दि.14) ट्रस्टचे अध्यक्ष नरसू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी शाळेचे प्रशासकीय अधिकारी रमाकांत गावंड, माध्यमिक विभाग मराठी माध्यमाचे मुख्याध्यापक गिरीश पाटील, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक भूषण जाधव, इंग्रजी माध्यमाचे मुख्याध्यापक अंकुश जोगळे, बालोद्यान विभागाच्या मुख्याध्यापिका वैशाली बोरचटे आणि इयत्ता चौथी व सातवीचे स्कॉलरशिप विषय शिक्षक उपस्थित होते. हा स्कॉलरशिप अभ्यास वर्ग शाळेच्या वेळा व्यतिरिक्त 1 तास अगोदर येऊन शिक्षक स्वतःचा जादा वेळ देऊन घेणार आहेत. अशाच प्रकारे इयत्ता दहावीचे इंग्रजी आणि मराठी माध्यमाचे शिक्षक अभ्यास वर्ग शाळेच्या वेळा व्यतिरिक्त 1 तास अगोदर येऊन घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड उत्साह आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष नरसू पाटील यांनी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही, असे सांगताना स्कॉलरशिप मिळवण्यासाठी ध्येयवेडे व्हा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
स्कॉलरशिप अभ्यास वर्गाला सुरुवात
