। बुलढाणा । प्रतिनिधी ।
बुलढाणा-चिखली राज्य मार्गावर बुधवारी (दि.11) भीषण अपघात झाला. स्कूलबस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
येळगावजवळील आश्रम शाळेजवळ बुधवारी हा भीषण अपघात झाला. बुलढाणा नजीकच्या सागवान येथील शिवसाई ज्ञानपीठ संस्थेची बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हि धडक इतकी भीषण होती की, यात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. घटनेतील मृत तरुण हा बुलढाणा तालुक्यातील खूपगाव येथील रहिवासी असून जिवन इंगळे असे त्याचे नाव आहे.