झिराड येथे स्कूल चलो अभियान

। सोगाव । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील आदिवासीवाडी व भोईर आळी येथे दी लाईफ फाऊंडेशनतर्फे स्कूल चलो अभियानांतर्गत प्रभातफेरीचे आयोजन केले होते. सर्व मुले-मुली शाळेत जावीत आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व समजावे हा प्रभातफेरी मागचा उद्देश आहे.
या कार्यक्रमाला रा.जि.प.समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांनी आवर्जून उपस्थिती दर्शवली होती. तर त्यांच्यासोबत रायगड जिल्हा परिषद उच्च माध्यमिक झिराड शाळेचे शिक्षक उमेश ठाकूर, प्रियांका म्हात्रे, सुचिता शास्त्री, अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच दी लाईफ फाउंडेशनचे प्रकल्प समन्वयक शिलानंद इंगळे, सोशल वर्कर माधुरी जगताप, राखी राणे आदी यांच्या उपस्थितीत ही प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रभातफेरीत सहभाग नोंदवून आपली उत्सुकता आणि उत्साह दर्शविला.

Exit mobile version