| उरण | प्रतिनिधी |
शिक्षकांसमोर उभ्या टाकलेल्या संच मान्यता शासन निर्णय आणि टीईटी (शिक्षक पात्रता परीक्षा) या संदर्भाने शिक्षकांच्या सेवेची शाश्वतीच उरलेली नाही. सेवेत असलेले शिक्षक हे अत्यंत भयग्रस्त झालेले आहेत. या अन्यायकारक कायद्याला वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटना, माध्यमिक शिक्षक संघटना शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या समन्वय समितीच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रभर 5 डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढत असतानाच रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या ठिकाणी आपल्याला एकजुटीचे दर्शन घडवायचे असल्याने सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राथमिक, माध्यमिक, शिक्षक, शिक्षकेतर संघटनांची समन्वय समिती रायगड तर्फे करण्यात आले आहे.







