। सोगांव । वार्ताहर ।
सारळ आदिवासीवाडी आणि झिराडनंतर आज दिनांक 13 जून रोजी दी लाईफ फाऊंडेशन तर्फे किहीम आदिवासीवाडी आणि बामणसुरे आदिवासीवाडी येथे स्कूल चलो प्रभातफेरीचे आयोजन करण्यात आले.
या प्रभातफेरीत रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किहीम आदिवासीवाडी शाळेचे मुख्याध्यापक सुनील माळवी आणि रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चोंढी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया काळे, शिक्षिका भावना हुमणे, चेतना थळकर, निलिमा म्हाञे, आराधना घरत तसेच विभागातील किहीम, कामत, किहीम आदिवासीवाडी, चोंढी आणि बामणसुरे आदिवासीवाडी येथील अंगणवाडी सेविका संध्या शेलार, नीला काठे, निवेदिता भोईर, रीना चिंबुलकर, धनश्री वर्तक आणि मदतनीस शुभांगी शंकर नाईक यांच्या सहकार्याने तसेच दी लाईफ फाउंडेशन चे प्रकल्प समन्वयक शिलानंद इंगळे, सोशल वर्कर माधुरी जगताप, राखी राणे यांच्या प्रयत्नाने स्कुल चलो प्रभातफेरी यशस्वी ठरली. रायगड जिल्हा परिषद शाळा चोंढी आणि रायगड जिल्हा परिषद शाळा किहीम आदिवासीवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी प्रभातफेरीत उपस्थित राहून आपला उत्साह दर्शवला. विद्यार्थ्यांना 5 जून पासून नियमित शाळेत येण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. दोन्ही शाळेच्या मुख्याध्यापकांनी दी लाईफ फाउंडेशनचे आभार मानले.