शालेय पारितोषिक वितरण सोहळा

। पाली । वार्ताहर ।

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे आणि टाटा कॅपिटल आयोजित तालुकास्तरीय शैक्षणिक व क्रीडा स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा ग.बा. वडेर हायस्कूल पाली येथे संपन्न झाला. यावेळी विठ्ठल घाडगे व बळीराम निंबाळकर यांच्या कलागुणांचे कौतूक केले. तर सुधागडातील शाळांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे यांच्याकडून केली जाईल, शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढे येणे आवश्यक आहे. सुधागडातील शाळांतून शिकणारा विद्यार्थी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आणि युपीएससी, एमपीएससीच्या परिक्षांमध्येही चमकला पाहिजे, असा विश्‍वास घाडगे यांनी व्यक्त केला.

सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे ही संस्था गेली 49 वर्षे सुधागड तालुक्यातील विद्यार्थी, तरुणांच्या शैक्षणिक विकासासाठी विविध शैक्षणिक, कला, क्रीडा विषयक उपक्रम राबवित आहे. टाटा कॅपिटल या संस्थेच्या सीएसआर निधीद्वारे सुधागडातील 14 शाळांना शैक्षणिक, क्रीडा साहित्य पुरवत आहे. एवढेच नव्हे तर विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व क्रीडा स्पर्धाही घेण्यात येतात. मार्च महिन्यात पार पडलेल्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा पार पडल्या.

याप्रसंगी विठ्ठल घाडगे, वसंत लहाने, राजू पातेरे, बळीराम निंबाळकर, विजय जाधव, अजय जाधव, हरिश्‍चंद्र मालुसरे, भाउसाहेब घोडके, संदेश उतेकर, नरेश शेडगे, सुजीत जगताप, पाटील, पाफाळे, वाघुले, खाडे आदी विविध शाळांचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version