। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या व व्यवस्थापनाच्या प्राथमिक शाळा 31 मार्चपासून सकाळच्या सत्रात 7 ते 12.30 या वेळेत पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी दिले आहेत.कोरोना महामारीमुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी नायर यांनी सकाळच्या सत्रात 7 ते दुपारी 12.30 या वेळेत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशानुसार 31 मार्चपासून सकाळी 7 ते दुपारी 12.30 पर्यंत सर्व शाळा सुरू राहतील. सोमवार ते शनिवार या दिवशी वेळापत्रकानुसार मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांनी सकाळी 7 वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.