। चिपळूण । वृत्तसंस्था ।
शहरातील कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसर्या मजल्यावर असलेल्या सदनिकेमध्ये मंगळवारी रात्री 11.30 वाजता अचानक आग लागली. या आगीने अक्षरशः रौद्र रुप धारण केले. भीषण आगीचा सामना करत अग्नीशामक दालने या सदनिकेमध्ये अडकलेल्या तिघांना सुखरूपपणे बाहेर काढले. कावीळतळी भागातील ऑर्चीड बिल्डिंग मधील तिसर्या मजल्यावर सय्यद यांच्या सदनिकेत एक कुटुंब भाड्याने राहतो. मंगळवारी रात्री अचानक एसीजवळ असलेल्या स्वीज जवळ शॉर्टसर्किट झाले.त्यानंतर काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले.माजी नगरसेवक शशिकांत मोदी यांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन बंब दाखल होताच तातडीने पाण्याचा मारा करून आग नियंत्रणात आणण्यात आली.