विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा

नेणवली शाळेत विज्ञान मेळावा साजरा

| पाली | प्रतिनिधी |

विज्ञान दिनाचे औचित्य साधूनसुधागड तालुक्यातील नेणवली शाळेमध्ये मंगळवारी विज्ञान मेळावा आयोजन करण्यात आले होते. गटशिक्षणाधिकारी साधूराम बांगारे व केंद्रप्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेमध्ये विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते सातवी या दोन गटांमध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल तसेच राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे, श्रीहरी धुळगुंडे यांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली हा दिन यशस्वी रित्या वैज्ञानिकरित्या संपन्न झाला.

केव्ही कन्याशाळेत विज्ञानजागर

| पनवेल | वार्ताहर |

केवी कन्या विद्यालयामझ्ये राष्ट्रीय विज्ञान दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला. इयत्ता सहावीतील विद्यार्थिनींनी पर्यावरण संवर्धनावर एक नाटिका सादर केली. तसेच काही विद्यार्थ्यांनीनी कवितेतून व भाषणातून विज्ञानाचे महत्त्व सांगितले. तसेच शाळेमध्ये जेएनपीटीचे अभियंता तांडेल यांनी विद्यार्थिनींना अंधश्रद्धा निर्मूलनावर मोलाचे मार्गदर्शन केले. मुख्याध्यापिका प्रगती दलाल, गिरी, सुनिता जाधव, कविता भगत शिरसाठ, नितीन पाटील, ठाकूर, शीद, सर्व शिक्षक शिक्षिका या सर्वांनी विद्यार्थिनींना मोलाचे मार्गदर्शन केले.

एमएसईए स्कूलमध्ये वैज्ञानिक प्रतिकृती

| नेरळ | प्रतिनिधी |

नेरळ येथील एम. एस. ई. ए इंग्लिश स्कूल एस नेरळ या शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात सहभागी होत आपल्या अनेक संकल्पना यावेळी प्रतिकृती मधून मांडल्या.

विज्ञान प्रदर्शनात शाश्‍वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रमम या करण्यात आले.या संकल्पनेवर आधारित हे प्रदर्शन असून विद्यार्थ्यांनी हाताने बनविलेले ड्रोन प्रदर्शित केले त्यासाठी एका वर्गाला स्पेस स्टेशनमध्ये रुपांतरित केले. काही विद्यार्थ्यांनी वैद्यकीय अनुवंश शास्त्राच्या मदतीने डी. एन. ची रचना केली तर काही विद्यार्थ्यांनी भुजल साठवण या विषयावर काही करून पाण्याचे प्रकूल्प महत्त्व पटवून दिले. तसेच काही विद्यार्थ्यांनी सौर ऊर्जा या तयार कले विषयावर प्रकल्प तयार केले. मुख्याध्यापिका शबनम सय्यद यांनी मोलाचे साहाय्य केले.

मांदाड येथे विज्ञानजत्रा

| तळे | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांदाड येथे विज्ञान दिन उत्साही व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विज्ञानजत्रा व आनंदबाजार यांचे आयोजन करण्यात आले होते. याचे उद्घाटन तळा तहसिलदार अण्णाप्पा कनशेट्टी यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी पुरुषोत्तम मुळे, धोंडीराज सूर्यवंशी, डॉ. एन ए डेग्वेकर, डॉ. बी जी भवरे, श्री धवण, दिलीप ढाकणे, विनायक सुतार डॉ. चैतन्य अनप, नरेश नागावकर, किसन मालुसरे, विठ्ठल देवकर, सरपंच तानाजी कालप, प्रभाकर करंजे, स्वप्नील म्हात्रे, पाटील श्री शिंदे, उर्वशी मालुसरे, सुरेश करंजे, उपस्थित होते.


यावेळी तहसिलदार कनशेट्टी, पुरुषोत्तम मुळे, प्रियंका दांडेकर, भूमिका दांडेकर, श्रावणी पिठे, रिया भरूड यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विज्ञान शिक्षक डॉ. एन ए डेग्वेकर, डॉ. बी जी भवरे, दिलीप ढाकणे, विनायक सुतार, डॉ. चैतन्य अनप, केंद्रप्रमुख श्री धोंडीराज सूर्यवंशी यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व सांगितले.

Exit mobile version