| खांब | प्रतिनिधी |
दीपक नायट्रेट कंपनी धाटाव आणि दीपक फाउंडेशन, रोहा येथील प्रोजेक्ट यंग सायंटिस्ट (एसटीईएम) टीम व रोहा येथील बांधकाम व्यावसायिक रामचंद्र नाकती यांच्या सहकार्याने महादेववाडी येथील प्राथमिक शाळेत राष्ट्रीय अभियंता दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या दिनाचे औचित्य साधून प्राथ. शाळा महादेववाडी व तळाघर या दोन शाळा मिळून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही शाळांमधील 42 मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे 21 मॉडेल तयार करून उत्तम सादरीकरण केले. या कार्यक्रमासाठी बांधकाम व्यावसायिक रामचंद्र नाकती, रोठ बु. सरपंच नितिन वारंगे, मैत्री फाउंडेशचे संस्थापक- अध्यक्ष निलेश वारंगे, सचिव- अक्षय वारंगे, सदस्य भारत वाकचौरे व नरेंद्र भगत, ग्रामपंचायत वाशी सदस्या समीक्षा सुतार, विषय शिक्षिका-पंचायत समिती रोहा- कल्पना नागरे, केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक नारायण गायकर, मुख्याध्यापक विलास सुटे, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष तेजस्वी सुतार, शिक्षक वृंद संतोष तपकिरे, ललित लेंडी, अश्विनी नाईक, शाळा व्यवस्थापन कमिटीचे सर्व सदस्य, दीपक फाउंडेशनच्या प्रकल्प समन्वयक प्रिती कापसे आणि प्रकल्प स्टेमच्या विषय शिक्षक तृणली पाटील, प्राजक्ता धुमाळ, प्राची शिर्के आणि अमोल जाधव, समुपदेशक ओजस्विनी महाडीक उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी रामचंद्र नाकती यांनी मुलांना पारितोषिक आणि सहभागी सर्व मुलांना प्रमाणपत्राचे वाटप करून मोलाचा हातभार लावला आहे.
राष्ट्रीय अभियंता दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शन
