‌‘शक्तीपीठ महामार्ग रद्द करा’

| सोलापूर | प्रतिनिधी ।

शक्तीपीठ महामार्गाविरोधात माजी खासदार राजू शेट्टी यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेत आषाढी एकादशीपर्यंत महामार्ग रद्द करण्याची घोषणा सरकारने करावी, अन्यथा राज्यभर मोठे आंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला. करकंब येथे झालेल्या शक्तीपीठ महामार्ग विरोधी एल्गार मेळाव्यात बोलताना शेट्टी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार योजनेचे ऑडिट करण्याची मागणी करत, नवीन महामार्ग उभारण्याऐवजी पाणी प्रकल्पांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यास तीव्र विरोध कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version