| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल-दुंदरे रस्त्यापासून सुमारे 200 मीटर अंतरावर राजमाती या वनविभागाच्या जागेतील झुडुपामध्ये एका महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडून आला होता. ही महिला अंदाजे 25 ते 50 वर्षे, उंची 4 फुट 10 इंच, डोक्यावरील केस लांबे, उजव्या कानात सफेद धातुचा टॉप्स, डाव्या हातातील मधल्या बोटात सफेद धातुची अंगठी, नाकात पांढरी धातुची नथ व त्यावर बारीक खडे, दोन्ही हाताच्या मनगटावर लाल पिवळा धागा, दोन्ही पायाच्या अंगठ्याच्या नखाला लालसर नेलपॉलीश, कमरेखाली नेसलेल्या वस्त्राचा स्टील हुक व काळ्या रंगाचा अर्धवट जळालेला तुकडा आहे. कोणीतरी या महिलेला हत्याराने मारून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जाळुन टाकला. याबाबत पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिलेच्या नातेवाईकांचा शोध सुरू असून या संदर्भात कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी वपोनि गजानन घाडगे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







