| आगरदांडा | प्रतिनिधी |
संतोष पुखराज जैन ही व्यक्ती हरवली असल्याची नोंद होताच मुरुड पोलीस ठाण्याकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या व्यक्तीबद्दल कोणास माहिती असल्यास अथवा कोठेही दिसल्यास मुरुड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन मुरुड पोलीस निरीक्षक नामदेव बडगर यांनी केले आहे.
मुरुड तालुक्यामधील मजगाव येथे राहणारे संतोष पुखराज जैन घरातून कोणाला काही न सांगता निघून गेले आहेत. याबाबत त्याचे भाऊ राजेश पुकराज जैन यांनी मुरुड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. रंगाने गोरा अंगाने मध्यम उंची 5 फूट चेहरा लांबट नाक सरळ उंच डोक्यावर पुढील बाजूस टक्कल मानेवर डाव्या बाजूस तीळ हा सफेत रंगाचा हाफ शर्ट व निळ्या रंगाची फुल पॅन्ट संतोषने परिधान केलेली आहे. या घटनेची पोलीस हवालदार गिरी यांनी नोंद केलेली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोंधळी हे करीत आहेत.