। मुंबई । प्रतिनिधी ।
नियमित वैद्यकीय अधिकारी उपलब्ध झाले नसल्याने जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली गठीत केलेल्या समितीमार्फत जिल्हा स्तरावरून तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांची यांची नियुक्ती करण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री प्रा.तानाजी सावंत उत्तरात दिली. यांनी लेखी स्वरुपात सांगितले. याबाबतचा प्रश्न आ.जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता.
जिल्हा रुग्णालय, अलिबाग व उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय येथे वर्ग-1 ते वर्ग-4 संवर्गाची एकूण 1099 पदे मंजूर असून, 768 पदे भरलेली आहेत व 339 पदे रिक्त आहेत. या पदांमध्ये वैद्यकीय अधिकारी संवर्गाची 54 पदे रिक्त आहेत. उपजिल्हा/ग्रामीण रूग्णालय येथे सर्जन व भुलतज्ञ यांची पदे रिक्त आहेत. परंतु सदर ठिकाणी कंत्राटी पध्दतीने व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विशेषज्ञांच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गट क व ड चे पद भरण्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेदरम्यान पेपर फुटी झाल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आली असून सदर भरती प्रक्रिया रद्द करण्यात आलेली आहे. असे सावंत यानी सांगितले.
रायगड आरोग्य सेवेत हंगामी कंत्राटी भरती करणार
