सराकरी अधिकारी फिरकला सुद्धा नाही
| नेरळ | वार्ताहर |
रायगड जिल्हा परिषदेच्या नेरळ विकास प्राधिकरणामधील विविध विकास कामांच्या मागणीसाठी आणि अतिक्रमण विरोधी कारवाईसाठी कोल्हारे ग्रामपंचायतचे सदस्य विजय हजारे यांनी दोन जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी देखील कोणत्याही शासकीय विभागाचा अधिकारी उपोषण कर्त्यांची भेट घेण्यासाठी पोहचला नाही.
दरम्यान, आमरण उपोषण सुरु केल्यानंतर आरोग्य विभागाचे डॉक्टर उपोषण कर्त्यांची प्रकृती तपासण्यासाठी येत असतात, मात्र दोन दिवसात नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा एकही डॉक्टर आरोग्य तपासणी करायला उपोषणस्थळी पोहचला नाही. याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हजारे यांनी नेरळ विकास प्राधिकरणामधील विविध 13 मुद्द्यांवर उपोषण सुरु केले आहे. नेरळ विकास प्राधिकरणे बांधलेल्या नेरळ व्यापारी संकुल येथे उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाला कोल्हारे ग्रामपंचायतमधील शेतकरी कामगार पक्षासह अन्य राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे.







