तरुणीला फूस लावून पळवले

पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील पडघे गाव येथील अलका विजय महतो या तरुणीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली आहे. अंगाने माध्यम, रंग गोरा, नाक सरळ, डोळे काळे, केस काळे लांब, अंगात चॉकलेटी रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेगिन्स तसेच पायात गुलाबी रंगाची सँडल असे तिचे वर्णन आहे. तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास तळोजा पोलीस ठाणे फोन नंबर 022- 27412333 किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र जाधव 9987118765 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version