तिरंदाजांची राज्यस्तरीय स्पर्धेतील सहभागासाठी निवड

। मुंबई । प्रतिनिधी ।
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील तिरंदाजी प्रशिक्षणाच्या उपक्रमातील विद्यार्थी-विद्यार्थिनींची 7 मे रोजी पवई येथे झालेल्या चाचणीत निवड झाल्याने राज्यस्तरीय स्पर्धेसाठी त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे. यामध्ये स्मारकातील एकूण नऊ जणांची निवड झाली आहे. यात नऊ वर्षाखालील आणि मिनी सब ज्युनिअर या स्तरावरील तिरंदाजांचा समावेश आहे. मुंबई जिल्हा तिरंदाजीमधील निवड चाचणी स्पर्धेत ही निवड करण्यात आली आहे.

तिरंदाजी उपक्रमाचे प्रमुख स्वप्निल परब यांनी यासंबंधात माहिती दिली. यानुसार नऊ वर्षाखालील मुलांमध्ये अद्वय सावंत, देवांश, अभय पांचाळ तर याच गटातील मुलींमध्ये शरयू, युक्ता पवार यांचा समावेश आहे. मिनी सबज्युनियर इंडियन राऊंडमध्ये मुलांमध्ये संंकल्प जाधव आणि अर्णव सावंत, तर मुलींमध्ये श्रमिका घाडिगावकर, सोनम शेलार आणि श्रिया राऊत यांचा तर मिनी सब ज्युनियर कंपाऊंड राऊंडसाठी वंश पांचाल यांची निवड झाली आहे.

Exit mobile version