| माणगाव | वार्ताहर |
माणगाव तालुका शेतकरी कामगार पक्षाची बैठक रविवारी (दि.26) कृषी उत्पन्न बाजार समिती माणगाव येथील सभागृहात पक्षाचे जेष्ठ नेते तथा राजिपचे माजी समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांचा विचार करता माणगाव तालुक्यात पक्ष संघटन अधिकतम मजबूत करण्यासाठी तालुका शेकाप चिटणीसपदी ज्येष्ठ नेते अस्लम राऊत यांची एकमताने निवड करण्यात आली.
या बैठकीत शेकाप सोडून गेलेले रमेश मोरे यांच्या समवेत पक्षाचा कोणताही निष्ठावंत कार्यकर्ता गेला नसल्याची चर्चा झाली. रमेश मोरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदाचा राजीनामा द्यावा अशी चर्चा झाली. आपली तालुका चिटणीसपदी निवड झाल्याबद्दल अस्लम राऊत यांनी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार व ऋण व्यक्त केले. राऊत पुढे म्हणाले की, पक्षाचे ज्येष्ठ नेते स्व.भाऊ प्रभाकर पाटील यांच्यासोबत मला रायगड जिल्हा परिषदेत काम करण्याची संधी मिळाली. भाऊंच्या नेतृत्वाखाली त्याकाळात पक्षाचे एक निष्ठेने काम केले. शेकाप हा गोरगरीब शेतकरी व कष्टकर्यांच्या पक्ष आहे. राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण करणे हा पक्षाचा उद्देश आहे. आगामी निवडणुका नजरेसमोर ठेऊन आपले नेते आमदार जयंत पाटील यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते मंडळी यांच्या हात बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागा. पक्षाची ध्येय- धोरणे व पक्षामार्फत तालुक्यात झालेली विकासकामे तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवून पक्ष संघटन अधिकतम मजबूत करूया. सर्वाना सोबत व विश्वासात घेऊन जसे आजपर्यंत मी पक्षाचे प्रामाणिकपणे काम केले आहे तसेच काम या पुढेही केले जाईल, असे कार्यकर्त्यांना राऊत यांनी आश्वासित केले.
या बैठकीला ज्येेष्ठ नेते हसनमिया बंदरकर, नामदेव शिंदे, रावसाहेब महाडिक, बाळकृष्ण आंबुर्ले, सखाराम जाधव, पक्षाचे तालुका कार्यालयीन प्रमुख राजेश कासारे, स्वप्नील दसवते, देगाव उपसरपंच दिनेश गुगले, मोर्बा माजी सरपंच विलास गोठल, माजी उपसरपंच अमोल मोहिते, निजाम फोपळूणकर, नितीन वाघमारे, अॅड.मुसद्दीक राऊत, चंद्रकांत सत्वे, रमेश बक्कम, दिलीप उतेकर, नरेश दळवी, तुळाजी दिवेकर, बाळा पेडणेकर, राकेश पातेरे, संतोष कडू, ईश्वर मोरे दिलीप तांबट, अक्षय जाधव, निलेश डोंगरे, शैलेश यादव आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.