शेकापच्या पनवेल शहर चिटणीसपदी भोईर यांची निवड

| पनवेल | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल शहर चिटणीसपदी नंदकिशोर भोईर यांची निवड करण्यात आली. शेतकरी कामगार पक्षाच्या पनवेल येथील कार्यालयात आयोजित सभेत याबाबतची घोषणा महानगरपालिकेचे जिल्हा चिटणीस गणेश कडू यांच्याकडून करण्यात आली. दरम्यान, आ. बाळाराम पाटील यांच्या हस्ते भोईर यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

याप्रसंगी पनवेल वि.स. विभाग अध्यक्ष काशिनाथ पाटील, महानगरपालिका माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष दत्तात्रेय पाटील, जिल्हा सहचिटणीस प्रकाश म्हात्रे, पनवेल अर्बन बँकेचे चेअरमन डॉ. हितेंद्र शहा, मा. नगरसेवक शंकर म्हात्रे, अरविंद म्हात्रे, गणेश पाटील, रवींद्र भगत, डॉ. सुरेखा मोहोकर, अतुल भगत, सुनील बहिरा, दिनकर म्हात्रे व अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version