| पनवेल | वार्ताहर |
दीपाली रामचंद्र पाटील यांना परीक्षेत घवघवीत यश मिळाले असून त्यांची करनिर्धारण व प्रशासकीय अधिकारी पदी निवड झाली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पनवेल तालुक्याच्यावतीने दीपाली यांचा सत्कार करण्यात आला. दीपाली पाटील या पनवेल तालुक्यातील देवीचापाडा येथील रहिवाशी आहेत. याप्रसंगी शिवसेना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर, विभागप्रमुख प्रमोद पाटील, उपविभागप्रमुख परशुराम भोपी, युवासेना तालूका अधिकारी मनोज कुंभारकर, युवासेना पनवेल विधानसभा चिटणीस जीवन पाटील, शाखाप्रमुख विलास पाटील, शाखाप्रमुख व सरपंच नितलस संदीप पाटील, सुनिल काठे, दिलीप पाटील, रामदास फडके तसेच देवीचापाडा गावातील संजय पाटील, ज्ञानदेव पाटील, नंदकुमार साखरे, सूर्यकांत पाटील, विकास पाटील, दिनेश म्हात्रे, विजय पाटील दीपाली यांचे वडील रामचंद्र पाटील, भाऊ प्रदीप पाटील हे उपस्थित होते. यावेळी पनवेल तालुक्याच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीस भगव्या शुभेच्छा देण्यात आल्या.
दीपाली पाटील यांची प्रशासकीय अधिकारी पदी निवड
