कर्जत तालुक्यात उपसरपंचांची निवड

| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील सात ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाची निवडणूक झाली. त्यात शिवसेना शिंदे गटाकडून तीन ग्रामपंचायत मध्ये तर महविकास आघाडीचे चार ठिकाणी उपसरपंच बनले आहेत. महविकास आघाडी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तर शिवसेना ठाकरे गट आणि शेतकरी कामगार पक्षाचे प्रत्येकी एक एक ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच बनले आहेत.

उपसरपंचपदाच्या निवडणुकीच्या आधी थेट सरपंच यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला. त्यात मांडवणे मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या रंजना सावंत यांनी तर कळंब मध्ये शेतकरी कामगार पक्ष ग्रामविकास आघाडीचे प्रमोद कोंडीलकर, दहीवली तर्फे वरेडी मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या मेघा मिसाळ यांनी तर उकरुळ मध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या नीलिमा थोरवे, वेणगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महा विकास आघाडीच्या अश्‍विनी पालकर तसेच वावलोली मध्ये शिवसेना शिंदे गटाचे एकनाथ भगत आणि कोंडीवडे मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महविकास आघाडीचे प्रमोद देशमुख यांनी 2 जानेवारी रोजी सकाळी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्या सर्व थेट सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. वावलोळी ग्रामपंचायत मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अपर्णा थोरवे यांची तर मांडवने मध्ये शिवसेना ठाकरे गटाचे सचिन भोईर यांची बिनविरोध निवड झाली. त्याचवेळी कळंब ग्रामपंचायत शेकापचे प्रकाश निरगुडे आणि उकरुळ ग्रामपंचायत मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलास खडे या सर्वांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली.

तालुक्यातील दहिवली तर्फे वरेडी मध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक झाली,त्यात शिवसेना शिंदे गटाचे अभय धुळे आणि महविकास आघाडीचे नरेश कालेकर यांना मतदानात प्रत्येकी सहा मते मिळाली, त्यामुळे सभेच्या अध्यक्ष सरपंच मेघा मिसाळ यांनी आपले कास्टिंग मत अभय धुळे यांच्या बाजूने टाकले आणि त्यामुळे उपसरपंच पदी धुळे निवडून आले.या ग्रामपंचायत मध्ये आता थेट सरपंच आणि नव्याने निवडून आलेले उपसरपंच हे दोन्ही वंजारपाडा या एकाच गावातील आहेत. कोंदिवडे ग्रामपंचायत उपसरपंच पदासाठी झालेल्या निवडणुकीत महा विकास आघाडीच्या आरती दीक्षित यांना सात तर शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र गायकवाड यांना चार मते मिळाल्याने आरती दीक्षित या विजयी झाल्या. तालुक्यातील वेणगाव ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदाच्या निवडणुकीत महविकास आघाडी कडून समिर पेठे यांना चार तर शिवसेना शिंदे गटाचे समिर कुडतरकर यांना सात मते मिळाली आणि त्यामुळे शिंदे गटाचे समिर कुडतरतर विजयी झाले विजयी झाले.

Exit mobile version