प्रसाद ढवळेची महाराष्ट्र संघात निवड

| पनवेल । वार्ताहर ।

रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या मार्फत (राष्ट्रीय ट्रायल) म्हणजे राष्ट्रीय निवड चाचणी यामध्ये रायगड जिल्ह्यातील पनवेलचा रहिवासी प्रसाद महेश ढवळे याची महाराष्ट्र संघात 5 व्यांदा निवड झाली आहे. तसेच प्रसाद महेश ढवळे हा 2021 ला महाराष्ट्र संघाचा कर्णधार होता.

बेंगळूरूमध्ये होणार्‍या रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे 60 वी राष्ट्रीय रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत प्रसाद ढवळेची निवड करण्यात आली आहे. तसेच 2019 मध्ये प्रसाद महेश ढवळे यांना रायगड भूषणने गौरविण्यात आले आहे. तसेच स्केटिंग मध्ये गेले अनेक वर्षांपासून प्रसाद हा रायगड जिल्हयाचे प्रतिनिधित्व करत आहे.

Exit mobile version