गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद
। माणगाव । प्रतिनिधी ।
बेळगाव, कर्नाटक येथे आयोजित गिनीज वर्ल्ड बुक रेकॉर्डमध्ये रोलर स्केटिंग प्रकारात शानदार प्रदर्शन करीत अन्विता संजय बुटे (वय-11), शिवगंगा रोलर स्केटर क्लब, बेळगाव कर्नाटक यांची सलग 96 तास ऑटो फॉर्मेशन रोलर स्केटिंग क्रीडा प्रकारचे आयोजन केले होते. सदर क्रीडा प्रकारात माणगाव येथील अन्विता संजय बुटे हिने रोलर स्केटिंग करून गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुवर्ण अक्षरात आपले नाव नोंदविले आहे. सदर विक्रमाची नोंद करत अटींचे स्केटलाईफ अकॅडमी मीरा रोड प्रशिक्षक संतोष मिश्रा आणि प्रफुल खरात यांनी मार्गदर्शन केले. तसेच या प्रतियोगितेकरिता देश-विदेशातून 1039 रोलर स्केटिंग खेळाडू सहभागी झाले होते. अन्विता हिचे वडील संजय बुटे आणि आई संजना बुटे यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच हा विक्रम नोंदविल्याबद्दल नगरसेवक नितीन दसवते, दसवते, नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.