। पनवेल । वार्ताहर ।
औरंगाबाद येथे झालेल्या राज्य पातळीवरील पावरलिफ्टिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी 8 पदके प्राप्त केली आहेत. रायगड जिल्ह्यातील या पदक प्राप्त खेळाडूंचे रायगड पावरलिफ्टिंगचे अध्यक्ष गिरीश वेदक, सचिव अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव तसेच संदीप पाटकर, राहुल गजरमल, यशवंत मोकल यांनी आनंद व्यक्त करून पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा देऊन सन्मानित केलं आहे. या स्पर्धेमध्ये सुहानी गावडे अलिबाग रौप्यपदक, प्रथमेश भालेकर कर्जत कास्यपदक, अमृता भगत खोपोली सुवर्णपदक, सलोनी मोर महाड रौप्यपदक, आयुष पालवे खोपोली कांस्यपदक, महेश पाटील वावोशी सुवर्णपदक, विनायक पाटील खोपोली रौप्यपदक, संतोष गावडे अलिबाग सुवर्णपदक यांनी कामगिरी केली आहे.