| नागोठणे | वार्ताहर |
नागोठणे विभागातील सर्वात मोठी व शेतकर्यांची संस्था असलेली नागोठणे विभाग सहकारी भातगिरणी मर्यादित, नागोठणे या संस्थेच्या सभापतीपदी रोहा पंचायत समितीचे माजी सभापती व पाटणसई येथील सदानंद गायकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.
सभापतीपदाच्या निवडीसाठी संचालकांच्या एका बैठकीच्या आयोजन सोमवार, दि. 5 ऑगस्ट रोजी संस्थेच्या कार्यालयात दुपारी करण्यात आले होते. यावेळी सभापतीपदासाठी सदांद गायकर यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी एस.एल. कावले यांनी सदानंद गायकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. संस्थेची पंचवार्षिक निवडणूक प्रक्रिया 19 जुलै रोजी सल्लागार मंडळाच्या अथक प्रयत्नाने बिनविरोध पार पडली होती.
यावेळी नवनिर्वाचित संचालक चंद्रकांत गायकवाड, तानाजी लाड, एकनाथ ठाकूर, गणपत म्हात्रे, मारुती शिर्के, सुरेश देवरे, प्रकाश धामणे, राजू जांबेकर, सुजाता जवके, शैला ठमके, सल्लागार भाई टके, शिवराम शिंदे, मारुती देवरे, मधुकर ठमके, प्रभाकर ठाकूर, अनंत वाघ, हिराजी शिंदे, पांडुरंग गायकर, शंकर ठाकूर, सुधाकर जवके, संतोष कोळी, बाळासाहेब टके, प्रमोद जांबेकर, विनायक गोळे, प्रथमेश काळे, मधुकर गायकर, ज्ञानेश्वर शिर्के, लहू तेलंगे, श्रीरंग देवरे, श्रीकांत रावकर, प्रवीण जांबेकर, विजय भोसले, आसिफ अधिकारी यांच्यासह सभासद यावेळी उपस्थित होते. नागोठणे विभाग सहकारी भातगिरणीच्या सभापती पदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी एस.एल. कावले यांना संस्थेचे सचिव अनिल पवार व शिपाई रामचंद्र देवरे यांनी सहकार्य केले.