जिल्हाप्रमुखपदी संतोष कवळे यांची निवड

। अलिबाग । वार्ताहर ।

कराटे या क्रीडा प्रकाराचा राज्यभर प्रचार व प्रसार करण्यासाठी युवा कार्यक्रम तसेच खेल मंत्रालय भारत सरकारशी संलग्न असणार्‍या स्टेअर्स फाउंडेशनच्या रायगड जिल्हाप्रमुखपदी कराटे प्रशिक्षक संतोष रामचंद्र कवळे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे टूर्नामेंट टेक्निकल डायरेक्टर गणेश मंगल गिरी, तसेच कराटे प्रमुख विशाल जाधव, महाराष्ट्र राज्याचे स्पर्धा समिती चेअरमन राजकपूर बागडी यांच्याद्वारे करण्यात आली.

संतोष कवळे यांच्या स्टेअर्सच्या रायगड जिल्हाप्रमुखपदी झालेल्या निवडीमुळे जिल्ह्यातील कराटे खेळाडूंना स्टेअर्स (युवा कार्यक्रम एवं खेल मंत्रालय भारत सरकार)च्या माध्यमातून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय कराटे स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. तसेच, मुलींना व महिलांना स्वतःचे स्वरक्षण करता यावे यासाठी जिल्ह्यात कराटे प्रशिक्षण शिबीरदेखील घेतली जाणार आहेत.

Exit mobile version