| नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील पळसदरी ग्रुप ग्रामपंचायतमधील रिक्त असलेल्या उपसरपंच पदावर शितल स्वप्निल देशमुख यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच मनीषा गोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे तेथे रिक्त असलेल्या उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून सरपंच जयेंद्र देशमुख यांनी काम पाहिले. निर्धारित वेळेत उपसरपंच पदासाठी देशमुख यांचा अर्ज दाखल झाल्यामुळेदेशमुख यांची बिनविरोध निवड जाहीर केली. यावेळी मनोहर थोरवे, मनोहर देशमुख स्वप्नील देशमुख, अरुण देशमुख, मधुकर देशमुख, विलास म्हाबदी, सुनील शिर्के, अक्षय देशमुख, तुषार देशमुख, अक्षय म्हाबदी,अनिकेत म्हाबदी, संदेश देशमुख, रोहित नरे, विवेक देशमुख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.