| खोपोली । प्रतिनिधी ।
विश्वनिकेतन अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकी तसेच प्रशिक्षण आणि प्लेसमेंट विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी खालापूर तालुक्यातील कुंभीवली येथील महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी 150 हून अधिक विद्यार्थी आणि कर्मचार्यांनी रक्तदान केले.या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष डॉ. संदीप इनामदार, सुनील बांगर, प्राचार्य डॉ. बी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ. एस. बी. कदम, डॉ. विकास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती आणि मार्गदर्शन लाभले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शिल्पा देशपांडे यांनी केले. प्रा.प्रीती नागरगोजे आणि प्रा. शरद वाघ हे कार्यक्रमांचे समन्वयक होते. प्रा.शरद वाघ यांनी आभारप्रदर्शन केल्यानंतर शिबिराची सांगता झाली.