| खरोशी | वार्ताहर |
एनव्हीजी एज्युवेंचर्स फाऊंडेशन पेणच्या कोनायसन्स स्कूलमधील इयत्ता आठवीत शिकणार्या स्वरा मंगेश पवार या विद्यार्थिनीची कन्याकुमारी येथे होणार्या थांग-ता या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्कूलच्या विद्यार्थ्यांनी एक सुवर्ण, एक रौप्य व 11 कांस्यपदके पटकाविली आहेत.
कोल्हापूर येथे नुकत्याच झालेल्या 26 व्या राज्यस्तरिय थांग-ता स्पर्धेत पेणच्या कोनायसन्स स्कूलने देदीप्यमान यश प्राप्त केले असून, या स्पर्धेत एक सुवर्ण, एक रौप्य व 11 कांस्यपदकांची कमाई झाली आहे. या स्पर्धेत इयत्ता आठवीत शिकणार्या स्वरा पवार हिने सुवर्णपदक, विराज मोकलने रौप्य पदक जिंकले असून, दूर्वा पेरवी, दिशा गुरव, युवराज भगत, यदर्थी पाटील, गायत्री कारखानीस, स्वरूपा चौधरी, आयुष पाटील, राजविर देशमुख, कुशल सिंग, पुष्कर म्हात्रे, निल पाटील यांनी कांस्यपदक पटकाविले आहे.
सर्व विद्यार्थ्यांचे एनव्हीजी एज्युवेंचर्स फाउंडेशनचे संचालक अॅड. मंगेश नेने, डॉ. मनीष वनगे, अॅड. तेजस्विनी नेने, डॉ. सोनाली वनगे, प्रकाश गुरव, शाळेच्या मुख्याध्यापिका सुप्रिया विखणकर, क्रीडा शिक्षक आदित्य तेरेदेसाई व सर्व शिक्षकवृंद यांनी कौतुक केले आहे. स्वरा हिची कन्याकुमारी येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.






