वॉटर पोलो संघासाठी निवड चाचणी

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

अक्वॉटिक असोसिएशन ऑफ रायगड, यांच्या पुढाकाराने राज्य वॉटर पोलो संघाच्या निवड चाचणीसाठी जिल्ह्यातील सर्व वॉटर पोलो संघांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. निवड चाचणी रविवारी (दि.4) सकाळी रिलायन्स इंस्ट्रीज लि., नागोठणे येथील स्विमिंग पूल येथे घेण्यात येणार आहे.

महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन यांच्या विद्यमाने राज्य ऑलिम्पिक खेळांचे आयोजन दिनांक 9 ते 12 जानेवारी 2023 रोजी श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी बालेवाडी, पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे. सदर खेळांच्या अनुषंगाने स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने राज्य वॉटर पोलो संघाची निवड चाचणी दि. 14 ते 15 डिसेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडा नगरी बालेवाडी, पुणे येथे आयोजित करण्यात आली आहे.

दरम्यान, जिल्हा वॉटरपोलो संघ निवडण्यासाठी निवड चाचणी रविवारी (दि.4) रिलायन्स इंस्ट्रीज लि., नागोठणे येथील स्विमिंग पूल येथे घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सर्व पुरुष व महिला वॉटर पोलो संघांनी अथवा खेळाडूंनी प्रवेशासाठी दत्ता तरे, वेटरपोलो प्रशिक्षक 8983895307 यांच्याशी संपर्क साधावा. 14 वर्षा खालील खेळाडूंना भाग घेता येणार नाही तसेच रेल्वे अथवा सर्व्हिसेसमधील खेळाडूंनासुद्धा भाग घेता येणार नाही. वॉटर पोलो संघासाठी 13 खेळाडूंची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती सूर्यकांत ठाकूर, सचिव, अक्वॉटिक असोसिएशन ऑफ रायगड यांनी दिली आहे.

Exit mobile version