स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ कॅरम स्पर्धा

| अलिबाग | वार्ताहर |
रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी अध्यक्ष व सल्लागार स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या स्मरणार्थ शनिवार, 23 व रविवार, 24 जुलै रोजी जिल्हा कॅरम अजिंक्यपद व निवड स्पर्धा 2022-23चे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा राष्ट्रवादी भवन, दहिवली, कर्जत येथे ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. स्पर्धा पुरुष एकेरी, महिला एकेरी व पुरुष प्रौढ (वयस्कर) या तीन गटात खेळविण्यात येणार आहे. महिला एकेरी व प्रौढ गट पुरुष यांची स्पर्धा रविवारी 24 जुलै रोजी खेळविण्यात येईल. या स्पर्धेकरिता रोख बक्षिसे व आकर्षक चषक देण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्रवेश फी 200/- (खेळाडू नोंदणीसह) आहे. स्पर्धेची प्रवेश फी खाली नमूद केलेल्या व्यक्तींकडे मंगळवार, दि.19 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येईल. नोंदणी करण्यासाठी दिपक साळवी, पोयनाड 7020602335, सचिन नाईक, पनवेल 9222171260, पांडुरंग पाटील , कर्जत 7517570805, मनीष जोशी, महाड 8830387669, अमित यादव, रसायनी 9822791520 यांच्याशी संपर्क साधावा.

या स्पर्धेकरिता जिल्हा असो.तर्फे खेळाडूंना दोन्ही दिवस दुपारच्या भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे. स्व. नथुराम भाऊ पाटील (माजी कार्यवाह व सल्लागार) यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष गिरीश तुळपुळे व कार्यवाह दिपक साळवी यांनी केले आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या खेळाडूंना पुढील महिन्यात 56व्या सिनियर राज्य कॅरम स्पर्धेकरिता जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.

Exit mobile version