विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे धडे

एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण

| म्हसळा | वार्ताहर |

शासनाच्या महिला व बाल विकास विभागातर्फे राजमाता जिजाबाई युक्ती स्वसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम एकात्मिक बाल विकास प्रकल्प म्हसळा यांच्यातर्फे वसंतराव नाईक कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल, अंजुमन हायस्कूल म्हसळा येथे नुकताच संपन्न झाला. शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या आदेशान्वये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात 450 हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग घेतला.

राज्यात महिलांवर होणाऱ्या आत्याचाराचे प्रमाण वाढत असून, आपल्या स्वसंरक्षाणाच्या दृष्टीने या प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे प्रकल्प अधिकारी अधिकारी वैष्णवी कळबस्कर यांनी सांगितले. महिलानी सक्षम होऊन स्वतःचे रक्षण करता यावे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी सांगितले. सदर प्रशिक्षणासाठी खोपोलीवरुन प्रशिक्षक धीरज पंडित, निकिता मांडवकर, नितीन बोंदार्डे, शालिनी लोदी यांनी उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले.

यावेळी प्रकल्प अधिकारी वैष्णवी कळबस्कर, विस्तार अधिकारी दिपाली पावले, रेणुका पाटील, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य दिगंबर टेकळे, एम.एस. जाधव, श्रीम. सलमा मॅडम, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश हाके, देवगावकर मॅडम, कुताडे मॅडम, अंजुमन हायस्कूलच्या श्रीम. सरखोत मॅडम, अंजुमनचे प्राचार्य अ. रहमान घराडे, कर्मचारी वर्ग तसेच शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.

Exit mobile version