जेष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे कालवश

मुंबई । वृत्तसंस्था ।
सिने सृष्टीद्वारे रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या ज्येष्ठ अभिनेत्री माधवी गोगटे कोरोनामुळे कालवश झाल्या आहेत. सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 58 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्‍चात पती आणि मुलगी असा परिवार आहे. माधवी गोगटे यांनी मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या. त्यांच्या काही भूमिका चांगल्याच गाजल्या. घनचक्कर, सत्वपरीक्षा इत्यादी चित्रपटातही भूमिका त्यांनी काम केलं होतं. गेला माधव कुणीकडे, भ्रमाचा भोपळा ही त्यांची नाटकं चांगलीच गाजली.

Exit mobile version