ज्येष्ठ नागरिक संघ वर्धापनदिन उत्साहात

| श्रीवर्धन | वार्ताहर |

ज्येष्ठ नागरिक संघ, गोग्रासवाडी परिसर, डोंबिवली पूर्वचा 24 वा वर्धापन दिन सोहळा रविवार, दि.10 रोजी वक्रतुंड सभागृह, डोंबिवली पूर्व येथे फेस्कॉम, कोकण प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष श्या.गो. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. गणेश धारगळकर, अध्यक्ष, डोंबिवली सहकारी बँक उपस्थित होते. दीप प्रज्वलनानंतर सुनिता खेडकर यांच्या गणेश वंदनेने प्रारंभ झाला. प्रगती कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सभाध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांना श्रीफळ, भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच, वयाची 75 वर्षे पूर्ण झालेल्या व विवाहास पन्नास वर्षे पूर्ण झालेल्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी 10 वी, 12 वी व पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या पाल्यांचाही सत्कार करण्यात आला. आभार प्रदर्शनानंतर पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Exit mobile version