ज्येष्ठ काँग्रेस नेते वसंत म्हात्रे यांचे निधन

पेण | वार्ताहर |
पेण तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते, सुप्रसिद्ध मल्ल वसंत लक्ष्मण म्हात्रे (बापू)(वय 92) यांचे नुकतेच निधन झाले. कोप्रोली पंचक्रोशीत ते सोडेवाले म्हणून प्रसिध्द होते. न्याय निवाड्यासाठी अग्रस्थानी असायचे व त्यांचा शब्द हा अंतिम मानला जायचा.माजी मुख्यमंत्री बॅ.अ.र.अंतुले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात असत.
पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील मुल शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून अंतुले यांच्या मदतीने व के.आर. पाटील यांच्या साथीने महाराष्ट्र शिक्षण संस्था सुरु केली. गरीबांच्या मुलांना शिक्षणांची सोय केली. तालुक्यात आजचे जे सार्वजनिक विद्यामंदीर प्रसिद्ध आहे त्याचे सारे श्रेय हे स्वर्गीय बापूंना द्यावे लागेल.तसेच कोप्राली पंचक्रोशीत कुस्तीला आणि कबड्डीला नवसंजीवनी देण्याचे काम बापूंनी केले. बापू स्वतः एक उत्तम कुस्तीपट्टू होते. कुस्तीमध्ये खेळाडूनां मानधन देण्याची सुरुवात देखील बापूंनी स्वतः पासून केली होती.कोप्रोली पंचक्रोशीत कुस्ती आणि कबड्डीतून जे काही तरुण कामधंद्याला लागले त्याचे सर्व श्रेय हे बापूंना दयावे लागेल. त्यांच्या पश्‍चात चार मुले व चार मुली असा परिवार आहे. कोप्रोली येथील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय,शैक्षणिक, क्रिडा क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version