| अलिबाग | प्रतिनिधी |
दैनिक कृषीवलचे ज्येष्ठ पत्रकार धनंजय सावरगांवकर यांचे बुधवारी (दि.3) राहत्या घरी अल्पशा आजाराने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय 78 वर्षे होते. पाली येथील सावरगांवकर गेल्या अनेक वर्षापासून पत्रकार क्षेत्रात कार्यरत होते. पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा त्यांनी कायमच प्रयत्न केला. पत्रकारिता क्षेत्रात काम करीत असताना, सामाजिक क्षेत्रातही ते सक्रीय होते. पाली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रात मान्यवर मंडळी, नातेवाईकांनी उपस्थितीत राहून श्रध्दांजली अर्पण केली. त्यांच्या पश्चात पूतणी, जावई, भाची, भाचा, नातवंडे असा परिवार आहे.
दशक्रीया विधी शुक्रवार ( दि.12) जानेवारीला करण्यात आली. त्यानंतर उत्तरकार्य रविवार ( दि.14) जानेवारी रोजी राहत्या घरी होणार असल्याची माहिती सावरगांवकर कुटूंबियांकडून देण्यात आली.
ज्येष्ठ पत्रकार धनंजय सावरगांवकर यांचे निधन
