पनवेलमध्ये गाड्यांची ‘सर्व्हिस आपल्या दारी’

प्रीतम म्हात्रेंच्या हस्ते सेवेचा शुभारंभ
| पनवेल | वार्ताहर |

देशात दुसरे व महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी ही अनोखी सेवा शुक्रवारपासून सुरु झाली असून, त्याचा फायदा सर्व मोटारसायकल धारकांना होणार आहे. यामुळे गाडीमालकांचा वेळ, पैसा व पेट्रोलची बचत होणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्‍चितच होईल, असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी या सेवेच्या उद्घाटनाप्रसंगी केले.

यावेळी प्रीतम म्हात्रे यांच्यासह झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल, एचओ स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अजय रैना, व्यवस्थापक आशिष धौंडियाल, एचएम मोटर्सचे मालक मनोज सुचक, सुनील सुचक, सीईओ हर्षल सुचक, सीईओ सिद्धार्थ सुचक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल यांनी सांगितले की, प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरु केली असून, एका वेळी 15 ते 16 गाड्यांचे सर्व्हिसिंग व इतर छोटी-मोठी कामे करण्यात येणार आहे. सदर गाडी ही त्या-त्याठिकाणी जाऊन सेवा देणार असल्याने त्याचा फायदा गाडीमालकांना होणार आहे.

Exit mobile version