| रोहा | प्रतिनिधी |
रोहे शहरातून मुरुड व अन्य पर्यटनस्थळी जाण्यासाठी सेवादल आळी हा परिसर जवळचा आणि सोयीचा असल्याने या भागात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. त्यामुळे या सेवादल आळीवर आता तिसऱ्या डोळ्याची नजर असणार आहे. कै. जनार्दन मारुती शेडगे ट्रस्टकडून माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांच्या हस्ते सेवादल आळी सन्मित्र मंडळाला 8 सीसीटीव्ही कॅमेरे प्रदान करण्यात आले. त्यामुळे संपूर्ण आळी आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या नजरेखाली येणार असून सुरक्षेच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत फायदेशीर आणि सोयीस्कर ठरणार आहे. यावेळी मंडळाचे अध्यक्ष मोहीत ताम्हणे, उपाध्यक्ष राहुल कुलकर्णी, दिलीप मेकडे, रवींद्र मगर, रमेश कुळकर्णी, सुधीर गोळे, प्रफुल्ल ताम्हणे, संदीप सावंत, हरी मेकडे, विजय सावंत, संजीव कुळकर्णी, राजीव कुळकर्णी, सुधीर ताम्हणे यांच्यासह इतर सदस्य, ज्येष्ठ, श्रेष्ठ, तरुण मंडळी आणि महिला वर्ग उपस्थित होते.
सेवादल आळीवर तिसऱ्या डोळ्याची नजर
