देवन्हावे ग्रुप ग्रामपंचयतीसाठी सात कोटींची पाणी योजना

खोपोली | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील देवन्हावे गु्रप ग्रामपंचायतीच्या पाणी योजनेसाठी 7 कोटी 11 लाख 50 हजार रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे. सरपंच अंकित साखरे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न कायमचा मार्गी लावण्यासाठी खा. सुनील तटकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.
या योजनेच्या कामाला सुरुवात होऊन पाण्याचा प्रश्‍न मार्गी लागणार असल्याची माहिती सरपंच अंकीत साखरे यांनी देत रायगड जिल्ह्यातील पहिली मोठी पाणी योजना होणार असल्याने महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे. पाणी योजनेतील पाणी प्रश्‍न 30 वर्ष कमतरता भासणार नाही, अशी माहिती पंचयतीच्या वतीने साखरे यांनी दिली आहे. यावेळी सरपंच अंकित साखरे, उपसरपंच संदेश चौधरी, सदस्य भगवान पाटील, ग्रामसेवक काळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कडव, भूषण कडव, श्रीकांत पाटील, संदेश पाटील, अविनाश पाटील, मनोहर बैसाणे, संजय पाटील आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version