| खोपोली | प्रतिनिधी |
देवन्हावे गावातील रोहित राजू कडव याच्या अकस्मात निधनानंतर मित्रांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी मित्रपरिवार अनेक सामाजिक उपक्रम राबवित असतानाच एकता मित्र मंडळ, एमजीएम हॉस्पिटल कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरास उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत 70 जणांनी रक्तदान केले.
ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरास पं.स. मा. सभापती श्रद्धा साखरे, सरपंच अंकित साखरे, माजी सरपंच विद्यमान सदस्य भगवान पाटील, उपसरपंच संदेश चौधरी, सदस्य स्नेहा कडव, वृषाली नलावडे, मंडळाचे संस्थापक संजय कडव, श्रीकांत पाटील, रोहिदास पाटील, सुधीर चौधरी, नितीन चौधरी, प्रसाद तावडे, बंटी नलावडे, माजी सदस्य अनिता नलावडे, मंडळाचे अध्यक्ष विनोद कडव, उपाध्यक्ष राजेंद्र नलावडे, सेक्रेटरी भूषण कडव, खजिनदार गिरीष नलावडे, शैलेश अंबावणे तसेच मंडळाचे सर्व सभासद उपस्थित होते.