। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील देवन्हावे ग्रुप ग्रामपंचायतीवर समर्थ आघाडीकडे बहुमत आहे. वृषाली बंटी नलावडे यांनी उपसरपंचपद वर्षभर यशस्वीपणे सांभाळल्यानंतर पुढील कालावधीसाठी संदेश बाबूराव चौधरी यांची बिनविरोध करण्यात आल्याने सर्वच स्तरातून नवनिर्वाचित उपसरपंच संदेश चौधरी याच्यावर अभिनंदन होत आहे.
देवन्हावे ग्रामपंचायत ही खालापूर तालुक्यातील एक प्रतिष्ठेची ग्रामपंचायत मानली जात असून ही ग्रामपंचायत राजकीय उलथापालथीने नेहमीच तालुक्यात चर्चिली जात असते. वृषाली नलावडे यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्याने त्यानंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी संदेश चौधरी यांचा एकमेव अर्ज आल्याने याची बिनविरोध उपसरपंचपदी निवड करण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस दत्ताजी मसुरकर, रा.जि.प.सदस्य नरेश पाटील, माजी खालापूर पंचायत समिती सभापती तथा विद्यमान सदस्या श्रद्धा साखरे, नगरसेवक मनिष यादव, मोहन औसरमल, कुलदीप शेंडे, अविनाश तावडे, सुरेश कडव आदी मान्यवर उपस्थित होते.