| मथुरा | वृत्तसंस्था |
यमुना एक्स्प्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, वॅगन आर कारचा अक्षरक्षः चक्काचूर झाला. या अपघातात कारमधील तीन पुरुष, तीन महिला आणि एका बालकाचा जागीच मृत्यू झाला. माईल स्टोन 68 जवळ ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधील सर्व लोक हरदोई येथून नोएडा येथे एका लग्नाला जात होते. त्यावेळी कॉल रायडर्स माइलस्टोन 68 जवळ गाडी पोहोचली असता, एका अज्ञात वाहनाने कारला जोरदार धडक दिली. यामध्ये एकाच कुटुंबातील सात जणांचा मृत्यू झाला असून, दोघे जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.