। रायगड । खास प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मार्फत दि.12 फेब्रु. रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रायगड जिल्ह्यातील इयत्ता पाचवीचे 375 आणि इयत्ता आठवीचे 342 विद्यार्थी, असे एकूण 717 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
दि.12 फेब्रु. रोजी सदरची परिक्षा पार पडली होती. त्याचा अंतिम निकाल दि.29 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर दि.29 एप्रिल ते 9 मे या कालावधीत गुणपडताळणीचे अर्ज ऑनलाईन मागितले होते. त्यानंतर दि.13 जून रोजी निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्ह्यात पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 7 हजार 150 विद्यार्थ्यांनी आपली नोंद केली होती. यापैकी 628 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. 6 हजार 522 परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी 1258 विद्यार्थी पात्र ठरले. निकषांच्या आधारे 375 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
इयत्ता आठवी म्हणजेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 5 हजार 82 विद्यार्थ्यांनी आपली नोंद केली होती. पैकी 4 हजार 692 विद्यार्थी उपस्थित होते. यापैकी 390 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित राहिले होते, तर 518 विद्यार्थी पात्र ठरले. निकषांच्या आधारे 355 विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक ठरले आहेत.
गुणवत्ता यादीत समाविष्ट नसण्याची कारणे
गुणवत्ता यादीत समावेश नसलेले विद्यार्थी, विद्यार्थ्यांपैकी शुल्क न भरलेले विद्यार्थी, विहीत कमाल वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचे विद्यार्थी, परीक्षेत गैरप्रकारात समाविष्ट विद्यार्थी, आवेदन पत्र न भरता परीक्षेस ऐनवेळी प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थी, शेकडा गुण मिळूनही प्रचलित निकषांची पूर्तता न करणारे विद्यार्थी, मान्यताप्राप्त नसलेल्या शाळांमधून परीक्षेस प्रविष्ठ झालेले विद्यार्थी
तालुका विद्यार्थी:-
पाचवी शिष्यवृत्ती
अलिबाग 14, कर्जत 12, खालापूर 11, महाड 44, माणगाव 27, म्हसळा 2, मुरूड 2, पनवेल 75, पेण 41, पोलादपूर 14, रोहा 94, श्रीवर्धन 1, सुधागड 1, तळा 6, उरण 31.
आठवी शिष्यवृत्ती
अलिबाग 33, कर्जत 12, खालापूर 21, महाड 60, माणगाव 32, म्हसळा 1, मुरूड 3, पनवेल 72, पेण 31, पोलादपूर 10, रोहा 28, सुधागड 7, तळा 1, उरण 30.