मुरुड: सात विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट डिग्री

| मुरूड | वार्ताहर |
मुरुड-जंजिरा हिंदू एज्युकेशन सोसायटी, ओमकार विद्या मंदिर सभागृह येथे ओकिनावा रियू कियू शितो – रियू कराटे – डो क्योकाई इंडिया या संस्थेच्या अंतर्गत कराटे परीक्षा पार पडली. सनी राजेंद्र खेडेकर यांनी ही परीक्षा आयोजित केली होती. या परीक्षेत मुरूडच्या सात विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट पदवी प्रधान करण्यात आली. कराटेची परीक्षा घेण्यासाठी केरळहून डॉ. आदित्य अनिल हे आले होते. या परीक्षेमध्ये सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. तसेच तालुक्यातील विद्यार्थ्यांनी ब्लॅक बेल्टची व कलर बेल्टची परीक्षा दिली. सनी राजेंद्र खेडेकर यांना तिसरी डिग्रीचा ब्लॅक बेल्ट देण्यात आला. शिवम धीरेंद्र सिंग ,पर्वणी नरेंद्र चोरघे या दोन विद्यार्थ्यांना कराटे मधून दुसरी डिग्री मिळाली. तसेच अनुज राजेश भोईर, तन्वी उषापती म्हात्रे, नेहल अरविंद घोले, पायल शिवराम राठोड या चार विद्यार्थ्यांना कराटे मधून पहिली डिग्री मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना ओकिनावा जपान ब्लॅक बेल्टचे आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र देण्यात आले.

परीक्षेमध्ये मुरुड, रोहा, अलिबाग, श्रीवर्धन, नवी मुंबई या तालुक्यातून विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सर्व विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवून आपापल्या नावे बेस्ट स्टुडन्ट अवॉर्ड बेस्ट फायटर अवॉर्ड असे विविध बक्षिसे आपल्या नावे केली. परीक्षेच्या दिवशी रियु कियु कराटे डो क्योकाई या संस्थेचे ( आंतरराष्ट्रीय संस्था ) ग्रँड मास्टर सोके कायबोन ओवारा यांनी व्हिडिओ कॉल करून सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधले. त्यांनी – सनी खेडेकर यांना जपानला येण्याचे निमंत्रण दिले. तसेच सर्व विद्यार्थी उत्तम गुणांनी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले व ग्रँडमास्टरनी सर्वांचे अभिनंदन केले. या कार्यक्रमाला दिलीप जोशी, उषा खोत, पांडुरंग आरेकर, अमित पाटील, राजेश भोईर, शिवप्रसाद रोडगे, युवराज विजय भगत, विनायक धुमाळ आदी उपस्थित होते.

Exit mobile version