रायगडच्या पाच विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट
| अलिबाग | प्रतिनिधी |
नुकतीच इंडियन ओकिनावा शोरिन रियु क्युडोकान कराटे डू इंडियाद्वारे मुरुड तालुक्यातील बोर्ली येथे ब्लॅक बेल्टची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेमध्ये मुरुड व अलिबाग मधील कराटेपट्टूंनी चमकदार कामगिरी बजावली आहे. रायगडच्या पाच विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्टची पदवी मिळाली. भारताचे मुख्य प्रशिक्षक सिहान अरुण बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली ही परिक्षा पार पडली. ब्लॅक बेल्टची पहिली पदवी प्रदान करण्यात आली. त्यामध्ये कु.परी शैलेश नाखवा (साखर आक्षी) कु.जान्हवी दिनेश नाखवा (साखर आक्षी)तसेच कु.हर्ष राजेश तेलंगे (नागाव हटाळे) तसेच ब्लॅक बेल्टची दुसरी पदवी प्रदान करण्यात आली. त्यात कु.वेद संजय पाटील (बेली – अलिबाग) कु.अनुश्री अरविंद भोपी (बोली – मुरुड) यांचा समावेश आहे. रायगडमध्ये कराटेचे प्रशिक्षण घेत असलेले सर्व विद्यार्थ्यांनी परिक्षा देऊन चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. अरविंद भोपी (मुख्य प्रशिक्षक) यांच्याकडे सर्व विद्यार्थी कराटेचे प्रशिक्षण घेत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद प्रकाश चौलकर आणि राधा संदीप ढापरे यांचे विशेष सहकार्य लाभले.